Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाभर मैदानात राडा, पठाण व जाॅन्सनमधील वाद मुद्द्यावरुन गुद्द्यावर…

भर मैदानात राडा, पठाण व जाॅन्सनमधील वाद मुद्द्यावरुन गुद्द्यावर…

जगभरातील दिग्गज माजी खेळाडूंचा समावेश असलेली ‘लिजेंड्स क्रिकेट लीग’मध्ये क्वालिफायर सामन्यात रविवारी (ता. 2) भिलवाडा किंग्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत झाली. या सामन्यात धावांचा पाऊस पडला. दोन्ही संघांनी तब्बल 450 हून अधिक धावांचा पाऊस पाडला..

‘लिजेंड्स क्रिकेट लीग’मधील दिग्गज खेळाडू निवृत्त झाले असले, तरी त्यांच्यातील चुरस थाेडीही कमी झालेली नाही.. त्याच्याच प्रत्यय कालच्या सामन्यात आला. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाण व ऑस्ट्रेलियाचा फास्ट बाॅलर मिशेल जाॅन्सन यांच्यातील वाद विकोपाला गेला. अगदी एकमेकांना धक्काबुक्की करण्यापर्यंत प्रकरण गेलं होतं.

नेमकं काय झालं..?

जोधपूरच्या मैदानावर रविवारी इरफान पठाणची भिलवाडा किंग्स व गौतम गंभीरच्या ‘इंडिया कॅपिटल्स’ या दोन संघात क्वालिफायरचा सामना पार पडला. या सामन्यात भिलवाडा किंग्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना, विल्यम पोर्टरफिल्ड (59), शेन वॅटसन (65) व युसूफ पठाण यांच्या (48) फटकेबाजीच्या जोरावर 226 धावांचा डोंगर उभारला.

भिलवाडा किंग्सच्या युसुफ पठाणने तडाखेबंद फटकेबाजी करताना, ‘इंडिया कॅपिटल्स’कडून खेळणाऱ्या जाॅन्सनच्या बाॅलिंगची अक्षरक्ष: पिसे काढली. त्यामुळे जाॅन्सन चांगलाच चिडला. बाॅल टाकल्यावर तो पठाणला उद्देशून काहीतरी पुटपुटला. शांत बसेल, तो पठाण कसला..? त्यानेही जाॅन्सनला थेट प्रत्त्युत्तर दिलं. मुद्द्यावरुन थेट गुद्द्यावर प्रकरण आलं.

भर मैदानावरच युसूफ पठाण व मिचेल जॉन्सनमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं.. त्याचे पर्यावसान नंतर तर थेट धक्काबुक्कीपर्यंत गेलं. अखेर पंचांनी मध्यस्ती करीत जाॅन्सनला बाजूला नेल्यावर युसुफ शांत झाला.

या सामन्यात गंभीरच्या इंडिया कॅपिटल्सनं बाजी मारली. न्यूझीलंडचा रॉस टेलर व विंडीजच्या अॅश्ले नर्सनं दमदार अर्धशतकं झळकावून संघाला विजय मिळवून दिला. टेलरनं 39 बॉल्समध्ये 84 धावा फटकावल्या, तर नर्सनं नाबाद 60 धावांची खेळी केली. त्यामुळे ‘इंडिया कॅपिटल्स’नं हा सामना तीन बॉल आणि 4 विकेट्स राखून जिंकला. येत्या 5 ऑक्टोबरला या स्पर्धेची फायनल होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -