Tuesday, July 8, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : मणेरमळ्यात धाडसी चोरी; ३ लाख १६ हजाराचा मुद्देमाल लंपास

Kolhapur : मणेरमळ्यात धाडसी चोरी; ३ लाख १६ हजाराचा मुद्देमाल लंपास

उचगाव पैकी मणेरमळा बाबासाहेब पाटील कॉलनी येथे घराचा कडी कोयंडा उचकटून घरातील लोखंडी व लाकडी कपाटाच्या तिजोरीचे दार तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे व चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण तीन लाख सोळा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी चोरीची घटना घडली.

नामदेव मसु बेलवळेकर (वय ६५ मुळ गाव. कुरुकली ता. कागल सध्या, रा. बाबासाहेब पाटील कॉलनी मणेर मळा उचगाव तालुका करवीर) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली. नामदेव बेलवळेकर यांच्या घरातील देवकार्यासाठी बाहेर गेले होते तर नामदेव बेलवळेकर हे घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते. यावेळी घराच्या खालच्या मजल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील तिजोरी फोडून त्यातील सोन्याचा कोल्हापुरी साज, झुबे, सोन्याची चेन, अंगठ्या, लॉकेट, लहान मुलाचे ब्रेसलेट, चांदीची बिंदिया ,चांदीचे ताट असे तीन लाख सहा हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दहा हजार रुपये असा एकूण 3 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केला.

विशेष बाब म्हणजे मणेर मळ्यात पोलिसांची गस्त चालू होती. तरीही चोरट्याने चोरी करण्याचे धाडस दाखवून गांधीनगर पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. याबाबत गांधीनगर पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -