Monday, February 24, 2025
Homeब्रेकिंगठाकरेंना पुन्हा एकदा धक्का; 2 खासदार, 5 आमदार शिंदे गटात जाणार?

ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का; 2 खासदार, 5 आमदार शिंदे गटात जाणार?

आजच्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट दोन्ही बाजूनी जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच आता शिंदे गट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. सध्या उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या आमदार खासदारांपैकी २ खासदार आणि ५ आमदार आज शिंदे गटात सामील होणार अशी माहिती शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे यांनी दिली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यापूर्वीच उद्धव ठाकरेंची हा मोठा झटका असेल.

नागपूर येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना कृपाल तुमाणे म्हणाले, ५० आमदार आणि १२ खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. आज दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असलेली एकनाथ शिंदेंची सेने हीच खरी शिवसेना आहे. राज्यात खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची युती झाली आहे असेही त्यांनी म्हंटल.

दरम्यान हे ५ आमदार आणि २ खासदार नेमके कोण याबाबत त्यांनी अधिक काही सांगितलं नाही. परंतु मराठवाडा किंवा मुंबई ते कुठलेही असतील सध्याकाळी मेळाव्यात ते स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं. ज्या आमदारांना, खासदारांना आमचे विचार पटत आहेत त्यांना सोबत घेऊ असेही कृपाल तुमाणे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -