Monday, August 4, 2025
Homeतंत्रज्ञानप्रतीक्षा संपली! Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro अखेर भारतात लॉन्च;...

प्रतीक्षा संपली! Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro अखेर भारतात लॉन्च; प्री-बुकिंगवर मिळेल कॅशबॅक, जाणून घ्या सर्व डिटेल्स!


गूगलची बहुप्रतिक्षित Pixel 7 सीरिज अखेर लॉन्च करण्यात आली आहे. Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro स्मार्टफोन आंतरराष्ट्रीय मार्केट आणि भारतामध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. गुगलने पहिल्यांदाच आपला फ्लॅगशिप पिक्सेल स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला आहे. Pixel 7 आणि Pixel 7 Pro ची रचना सारखीच आहे. गुगलच्या दोन्ही नवीन स्मार्टफोन्समध्ये नवीन रंगांसह अपडेटेड स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.



या स्मार्टफोन व्यतिरिक्त कंपनी स्मार्टवॉच Google Pixel Watch आणि इतर काही प्रोडक्टस ऑफर करत आहे. हे सर्व प्रोडक्ट्स कंपनीचे ऑनलाईन स्टोअर GoogleStore.com वरुन युजर्सना खरेदी करता येणार आहेत. Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन Android 13 सह येतात. गुगलने या स्मार्टफोनला 5 वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्याकडे स्टिरिओ स्पीकर आहेत. Google Pixel 7 सीरीजच्या दोन्ही नवीन स्मार्टफोन्सची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स याबद्दल सर्व काही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत…

Google Pixel 7 मध्ये 6.3-इंच AMOLED फुलएचडी स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीनचा रिफ्रेश दर 90 Hz आहे. डिव्हाइसमध्ये IP68 रेटिंग देण्यात आली आहे म्हणजेच फोन धूळ आणि पाणी प्रतिरोधक आहे. Google Pixel 7 मध्ये Gorilla Glass Victus प्रोटेक्शन आहे. हा स्मार्टफोन हॉरिजॉन्टल कॅमेरा बार डिझाइनसह येतो.



Google Pixel 7, Pixel 7 Pro ची भारतातील किंमत –
Google Pixel 7 ची भारतात किंमत 59,999 रुपयांपासून सुरू होते. परंतु बँक ऑफरसह हा स्मार्टफोन 49,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीवर मिळू शकतो. हा फोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. Pixel 7 स्मार्टफोन Snow, Obsidian आणि Lemongrass कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

तर, Google Pixel 7 Pro हा स्मार्टफोन 84,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होऊ शकतो. बँक ऑफरसह, हँडसेटवर 8,500 रुपयांची सूट मिळू शकते. हा फोन फ्लिपकार्टवरही उपलब्ध आहे. Pixel 7 Pro Hazel, Snow, Obsidian कलर पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -