Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : ‘हातकणंगले’ मतदारसंघातील ‘नळपाणी' योजनांसाठी 423 कोटी मंजूर

कोल्हापूर : ‘हातकणंगले’ मतदारसंघातील ‘नळपाणी’ योजनांसाठी 423 कोटी मंजूर

केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हातकणंगले लोकसभा मतदार संघातील एकूण 411 गावांमधील नळ पाणीपुरवठा योजनांसाठी 423 कोटी 86 लाख रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती खासदार धैर्यशील माने गुरुवारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. कोल्हापूर जिह्यातही जल जीवन मिशनचे काम वेगाने सुरू असून जलजीवन मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयामध्ये एकूण 1264 योजनांचा 1064 कोटी 40 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

आराखडा तयार करण्यात आला आह, असहा त्याना सागितल.
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जल जीवन मिशन कार्यक्रम सध्या राज्यभर प्रभावीपणे राबविणेत येत आहे. ‘हर घर नल से जल’ या घोषवाक्यानुसार या प्रकल्पांतर्गत सन 2024 पर्यंत प्रती व्यक्ती प्रती दिन 55 लिटर प्रमाणे प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा करणेचे उद्दीष्ट आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी राज्य शासनाने जलजीवन मिशन राबवत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत केलेल्या मागणीनुसार हातकणंगले लोकसभा मतदार संघात एकूण 411 योजनांचा 423 कोटी 86 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

या आराखडय़ास अनुसरून एकूण 388 योजनांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली आहे. तसेच 207 योजनांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून उर्वरीत योजनांच्या निविदा प्रसिद्ध करणेची कार्यवाही सुरू आहे. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील 130, शाहूवाडी तालुक्यातील 147, हातकणंगले तालुक्यातील 68 व शिरोळ तालुक्यातील 66 गावांमधील एकुण 491 योजनांचा समावेश आहे. सद्यस्थितीस हातकणगले लोकसभा मतदार संघात 336661 कुटुंबापैकी आज अखेर 224065 इतक्या कुटुंबांना कार्यात्मक नळजोडणी देण्यात आलेली असून ग्रामपंचायत मार्फत नळजोडणीचे काम प्रगतिपथावर आहेत. जिह्यातील सर्व शाळा व अंगणवाडय़ांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे, असे खासदार माने यांनी सांगितले.

पाणी साठवण योजनेंतर्गत 26 वाडया वस्त्यांचा आराखडा प्रस्तावित योजना व प्रगतिपथावरील योजना कार्यान्वीत झालेनंतर उर्वरित ठिकाणी नळ जोडण्या देण्यात येणार आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत अतिदुर्गम भागातील लोकांनाही टंचाई काळात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता स्वर्गीय मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजने अंतर्गत एकूण 26 वाडय़ा-वस्त्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे खासदार माने यांनी सांगितले.

मतदारसंघातील आणखी 80 गावात लवकरच योजना हातकणंगले मतदार संघातील अजून 80 गावांमधील नळ पाणी पुरवठा योजना लवकरच मंजूर करून या योजनांचे कामही भविष्यात पूर्ण करून योजना कार्यान्वित करणार आहे, असे खासदार माने यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -