Monday, August 4, 2025
Homeब्रेकिंगदिग्गज अभिनेते अरुण बाली यांचे निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा...

दिग्गज अभिनेते अरुण बाली यांचे निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

मनोरंजन क्षेत्रातून एक वाईट बातमी समोर आली आहे. अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारे अभिनेते अरुण बाली (Arun Bali) यांचे निधन झाले आहे. अरुण बाली यांनी वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण बाली यांचे पहाटे साडेचार वाजता निधन झाले. अनेक दिग्गज कलाकारांसोबतही त्यांनी काम केले होते. अनेक मालिकांमध्ये ते बाबुजींच्या भूमिकेत दिसायचे. केरदारनाथ चित्रपटामध्ये देखील ते दिसले होते.

अरुण बाली अनेक दिवसांपासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना हीरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते हे मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराशी झुंज देत होते. हा एक ऑटोइम्यून रोग आहे. हा आजार नसा आणि स्नायू यांच्यातील कम्युनिकेशन फेल्यूअरमुळे होतो.

अरुण बाली यांनी टीव्हीवरील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्यांनी ‘नीम का पेड़’, ‘दस्तूर’, ‘चाणक्य’, ‘देख भाई देख’, ‘द ग्रेट मराठा’, ‘शक्तिमान’, ‘स्वाभिमान’, ‘देस में निकला होगा चांद’, ‘कुमकुम – एक सुंदर बंध’ , ‘, ‘वो रहे वाली महलों की’ आणि ‘देवों के देव महादेव’ या प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले होते.

या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका

अरुण बाली हे बॉलीवूड चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेते देखील राहिले आहेत. त्यांनी ‘सौगंध’, ‘यलगार’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘खलनायक’, ‘राम जाने’, ‘पुलिसवाला गुंडा’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘सत्या’, ‘शिकारी’, ‘हे राम’, ‘आँखे’, ‘जमीन’, ‘अरमान’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘3 इडियट्स’, ‘बर्फी’, ‘ओह माय गॉड’, ‘पीके’, ‘एअरलिफ्ट’, ‘बागी’, ‘केदारनाथ’, ‘पानिपत’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -