Sunday, February 22, 2026
Homeमहाराष्ट्रनाशिक बस दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई, ट्रकचालाकाला अटक तर 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

नाशिक बस दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई, ट्रकचालाकाला अटक तर 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!


नाशिकमध्ये शनिवारी पहाटे प्रवासी बसला अपघात होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीमध्ये 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता तर अनेक प्रवासी जखमी झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताप्रकरणी आता नाशिकच्या आडगाव पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. तसंच शनिवारी रात्री उशिरा ट्रक चालकाला अटक सुद्धा केली. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

नांदूरनाका येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली. यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला ट्रकने धडक दिली. नाशिक- औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतला आणि क्षणात बसला भीषण आग लागली. शनिवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास हा भीषण अपघातात झाला. ही आग इतकी भीषण होती की, यामध्ये बसमधील 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर 38 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामध्ये बस जळून खाक झाली.

या दुर्घटनेप्रकरणी ट्रकचालक रामजी यादव, बसचालक ब्रम्हनाथ सोयाजी मनोहर पोहरादेवी वाशी, यांच्यासह दीपक शेंड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील ट्रक चालकाला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. आडगाव पोलिसांनी रात्री उशिराही कारवाई केली. ट्रक चालक रामजी यादव हा उत्तर प्रदेशचा आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर शासनातर्फे उपचार केले जाणार आहेत. तर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी 50 लाखांची मदत जाहीर केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -