ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुराकरत शिवसेनेला मोठा धक्का दिला. यानंतर शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. सध्या या दोन्ही गटामध्ये निवडणूक चिन्हावरुन वाद सुरु आहे. अशामध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचे आदेश देत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला. त्याचसोबत पक्षाचे नाव वापरण्यावरही बंद घातली. पक्षाचे नाव वापरण्यावरही बंद घातली. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी खूपच धक्कादायक आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आता न्यायालयात दाद मागण्यासाठी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयासंदर्भात आता ठाकरे गटाचे नेते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर उद्धव ठाकरे यांनी फक्त दोनच शब्दात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत ‘जिंकून दाखवणारच’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.