ताजी बातमी ऑनलाईन टीम
उडान योजनेमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यात आला. यामुळे अलायन्स एअरने आपली विमानसेवा कोल्हापूरला सुरू केली. मार्चपासून या कंपनीची विमान सेवा केंलमडली आहे. कोल्हापूरबेंगळूरनंतर कोल्हापूर -हैद्राबाद या विमानसेवेचे बुकींग बंद झाले आहे. या कंपनीची कोल्हापूरातील विमानसेवा बंद होण्याचे संकेत असून, नवीन मोठे विमान या मार्गावर उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावणे चार वर्षापूर्वी अलायन्स एअरने हैद्राबाद-कोल्हापूर, कोल्हापूरबेंगळूर, बेगळूर-कोल्हापूर, कोल्हापूर-हैद्राबाद अशी विमान सेवा सुरू केली. . 30 मार्च 2022 पासून कोल्हापूर-बेंगळूर ही विमान सेवा बंद झाली. तर सद्यस्थितीत कोल्हापूर-हैद्राबाद या मार्गावरील विमानसेवेचे वेळा पत्रक व बुकींग 30 ऑक्टोबरनंतर बंद असल्याचे सांगण्यात आले. 29 ऑक्टोब्रअखेर ही सेवा उपलब्ध आहे.
कोल्हापूर -हैद्राबाद या मार्गावर अलायन्स बरोबर इंडिगो कंपनीची विमान सेवा सुरू आहे. 76 सीटरच्या या दोन्ही विमान कंपनीला चांगला प्रतिसाद कोल्हापूरातून मिळत आहे. एकीकडे 4 ऑक्टोबरपासून स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू झाली. तर दुसरीकडे अलायन्स एअरचे कोल्हापूर-हैद्राबाद ही सेवा बंद होणार असल्याचे समजते. कोल्हापूर-हैद्राबाद या मार्गावर इंडिगो या एअर लाईनची विमानसेवा मात्र सुरू आहे. अलायन्स एअर बंद झाल्यास, या मार्गावर 90 सीटरचे नवीन विमान सुरू होण्याचे संकेत दिले जात आहे.