Sunday, August 3, 2025
Homeराजकीय घडामोडीभाजप वापर करुन घेतोय, उपयोग संपेल तेव्हा फेकून देईल, उद्धव ठाकरेंची टिका

भाजप वापर करुन घेतोय, उपयोग संपेल तेव्हा फेकून देईल, उद्धव ठाकरेंची टिका

ताजी बातमी ऑनलाईन टीम

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्न गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने आयोगाकडे तीन नावं आणि तीन चिन्हांचे पर्याय सादर केले आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच लाईव्ह आले. यावेळी त्यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर (BJP) टीका जोरदार केली. तसेच नवीन नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने लवकर निर्णय घ्यावा असे आवाहन देखील केले.



यंदाचा दसरा मेळावा अभूतपूर्व झाला. मेळाव्यासाठी साधेसुधे शिवसैनिक अर्धी भाकर घेऊन शिवतिर्थावर आले होते. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.

शिवसेनेच्या स्थापनेआधी शिवसेनाप्रमुख मार्मिकमधून मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत होते. तेव्हा घरी नेहमी मराठी माणसाची वर्दळ असायची. तेव्हा 19 जून 1966 माझ्या आजोबांनी या संघटनेला शिवसेना असं नाव दिलं. तेव्हा सर्वसामान्य लोकं सोबत होती.

पहिल्यांदा ठाणे पालिकेच्या निवडणुकीत यश मिळालं. त्यानंतर अनेक जण जोडले गेले आणि शिवसेनेचा विजयाचा रथ पुढे निघाला. अनेकदा संकटं आली, अनेकांनी जीव गमावला, तुरुंगवास सोसला पण शिवसेनाप्रमुखांनी आमच्यात मोडेन पण वाकणार नाही ही जिद्द बिंबवलेली आहे.

आज निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव गोठवलं, निवडणूक चिन्ह गोठवलं. शिवसेनाप्रमुख ज्या धनुष्यबाणाची पूजा करायचे ते चिन्ह रावणाने गोठवलं. ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं त्याच्याच काळजात तुम्ही कट्ट्यार घुसवली. यातून तुम्ही काय मिळवलं? असा सवाल त्यांनी शिंदे गटाला केला

शिंदे गटाला उद्देशून ठाकरे म्हणाले, ज्या शिवसेनेने मराठी मनाला आधार दिला, हिंदू अस्मिता जपली, ते नाव तुम्ही गोठवलं, यामुळे अनेक शिवसैनिक दु:खी झाले. पण संकट असेच असतात आणि त्यात संधी दडलेली असते. या संकटातील संधीचं मी सोनं करुन दाखवणार आहे.

यावेळी ठाकरेंनी भाजपवर देखील हल्लाबोल केला. भाजप त्यांचा वापर करुन घेतोय, उपयोग संपेल तेव्हा त्यांना फेकून दिले जाईल. पण मला खात्री आहे, सगळेच स्वार्थी नसतात. निष्ठा विकत घेता येत नाही. निष्ठावान माणसं माझ्यासोबत आहेत. शिवसैनिकांना दमदाट्या सुरु आहे. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी केले नाही ते तुम्ही आता उगडपणे करत आहात.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -