जळगावातील (Jalgaon) एका सेक्स रॅकेटचा (Sex racket) भांडाफोड झाला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात एका कंपनीच्या नावे असणाऱ्या ऑफिसमध्ये सेक्स रॅकेट सुरू होते. याठिकाणी पोलिसांनी (Jalgaon Police) छापा टाकला. यावेळी संशयित परिस्थितीत आढळलेल्या दोन पुरुषांसह सहा तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलेय. मात्र या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील नवीपेठ परिसरातील महावीर बँकेच्या पाठीमागे असलेल्या एका कार्यालयाच्या खोलीमध्ये हा प्रकार सुरु होता. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील नवीपेठ परिसरातील महावीर बँकेच्या मागे असलेल्या एका कार्यालयामध्ये हा काळा धंदा सुरु होता. पोलिसांनी याविषयी गोपनीय माहिती मिळाली. यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. या छापेमारीमध्ये येथे वेश्यव्यवसाय सुरु असल्याचे समोर आले. यावेळी 2 पुरुष ग्राहक आणि सहा तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलेय. या चौघांना पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यांची चौकशी केली जात आहे. रात्री उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
जळगाव शहरातील अनेक ठिकाणी अवैध सेक्स रॅकेट्स बिनधास्तपणे सुरु असल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र पोलिस अधिकारी व कर्मचारी हे त्याकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोपही जळगवातील नारगिकांकडून केला जात होता. या सेक्स रॅकेटला गांभिर्याने घेऊन त्यावर कारवाई करावी अशी मागणी सातत्याने समोर येत होती. तेव्हापासून पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोन हॉटेलवर छापे टाकले. यावेळी पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हा दाखल केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा शहर पोलिसांनी कारवाई करत अजून एका रॅकेटचा भांडाफोड केला आहे.