यंदा दिवाळीत लोक कपड्यांच्या खरेदीसह दुचाकी खरेदी करत असल्याने कंपन्या त्या दृष्टीने विविध ई-स्कूटरवर आता भरघोस डिस्काऊंट देत आहेत. जर तुम्हालाही पेट्रोलच्या अतिरिक्त खर्चापासून सुटका हवी असेल तर Ola, EVeium, GT Force कंपन्या आपल्या स्कूटरवर उत्तम ऑफर देत आहेत. ज्यात 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुम्हाला 15 हजार रुपयांपर्यंत सवलतीचा लाभ मिळू शकतो. या ऑफरमध्ये कधीही बदल होऊ शकतो.
Ola S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर:/ओला इलेक्ट्रिक फ्लॅगशिप S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला 10,000 रुपयांच्या डिस्काऊंट सह मिळू शकते. Ola S1 Pro ची सध्या किंमत जवळपास 1 30 लाख रुपये आहे. याशिवाय, कंपनीने Ola S1 वर सूट दिली तर ती 99,999 रुपयांच्या जवळपास मिळू शकते.
EVeium electric scooters: EVeium Smart Mobility ने आपल्या आकर्षक ई-स्कूटरवर 15,400 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. कंपनीची कॉस्मो ईव्ही अंदाजे सध्या 1 लाख 26 हजार रुपयांना उपलब्ध आहे. धूमकेतू EV आता 1 लाख 69 हजार तर जार EV सध्या 1.92 लाख रुपयांना आकर्षक सुटसह उपलब्ध आहे.
GT Force electric scooters: ई-स्कूटर निर्माता कंपनी GT Force ने आपली GT प्राइम प्लस आणि GT फ्लाइंग इलेक्ट्रिक स्कूटरवर 5 हजार रुपये सूट देत असल्याचं जाहीर केलं आहे. जीटी प्राइम प्लसची किंमत 56,692 रुपये असून सध्या ती 51,692 रुपयांना मिळू शकेल. तर GT फ्लाइंग ई-स्कूटरची मूळ किंमत 52,000 रुपये असून ही स्कूटर तुम्हाला 47,500 रुपयांना मिळू शकणार आहे.