Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : ५५ हजार रुपयाची फसवणूक अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

Kolhapur : ५५ हजार रुपयाची फसवणूक अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

राजापूरवाडी ता. शिरोळ येथील एका वृद्धास ५५ हजार रूपयास लुबाडून फसवणूक केल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांत अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरोळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तातोबा भीमगोंडा पाटील रा. राजापूर वाडी हे २९ ऑगस्ट रोजी १०:३० शिरोळ येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याकरिता गेले असता एक अनोळखी इसम येऊन आपणास पैसे काढून देतो असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले.

त्याचवेळी हातचलाखीने दुसरे बनावट कार्ड त्यांना दिले. त्यानंतर २९ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर अखेर वेगवेगळ्या ठिकाणी या एटीएमद्वारे ५५, ६७८ रु. काढण्यात आले. या घटनेनंतर तातोबा पाटील यांनी फसवणूक केल्याबद्दल अज्ञाताविरोधात भादंवि ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.

दिवसा ढवळ्या घडलेल्या या फसवणुकीच्या प्रकारामुळे बँक परिसरात घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान अनोळखी इसमास एटीएम देऊ नये. अशा इसमांपासून सावध राहावे असे आवाहन शिरोळ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -