Tuesday, July 8, 2025
Homeमनोरंजनआणखी एक अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात, चाहत्यांचा होणार Heart Break!

आणखी एक अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात, चाहत्यांचा होणार Heart Break!


टीव्ही मालिका ते साऊथ इंडस्ट्री असा प्रवास करणारी प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्याबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हंसिका मोटवानी लवकरच तिच्या स्वप्नातील राजकुमारसोबत लग्न बंधनात करणार आहे. ‘शाका लाका बूम बूम’ ची छोटी ‘करुणा’ हंसिका मोटवानी हिने ग्रँड वेडिंग प्लान केले आहे. ती जयपूरच्या 450 वर्ष जुन्या किल्ल्यात सप्तपदी घेणार आहे. हंसिका मोटवानीच्या लग्नाची तारीख जाणून घेऊया.

तिने लग्नासाठी 450 वर्ष जुना किल्ला निवडला आहे, जिथे ती तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराशी लग्नगाठ बांधणार आहे. राजस्थानमधील जयपूर येथील मुंडोटा किल्ल्यावर त्यांच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम होणार आहेत.

हंसिका मोटवानीने तिच्या लग्नाच्या बातमीवर दुजोराही दिलेला नाही. मात्र, जयपूरच्या या किल्ल्यात तयारी सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांचेही भव्य स्वागत केले जाईल. हंसिकाने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. तिने प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘शाका लाका बूम बूम’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘सोन परी’ यासह अनेक शोमध्ये काम केले आहे. ती हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटातही होती. याशिवाय तिने बॉलिवूडमध्ये ‘आपका सुरुर’, ‘मनी है तो हनी है’ सारखे अनेक चित्रपट केले आहेत. दरम्यान, ती आता प्रामुख्याने दाक्षिण चित्रपटसृष्टीत काम करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -