Sunday, July 6, 2025
Homeक्रीडापुन्हा जुन्या फॉर्मॅटमध्ये परतणार IPL, डिसेंबरमध्ये तारखेला सुरु होणार लिलाव

पुन्हा जुन्या फॉर्मॅटमध्ये परतणार IPL, डिसेंबरमध्ये तारखेला सुरु होणार लिलाव


तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आयपीएल (IPL 2023) आपल्या जुन्या रंगात परतण्यासाठी सज्ज आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या वर्षाच्या अखेरीस आयपीएल 2023 चा लिलाव होणार आहे. फ्रँचायझीसाठीही एक आनंदाची बातमी आहे. आता तो खेळाडूंवर 90 कोटी ते 95 कोटी रुपये खर्च करू शकणार आहेत. रिपोर्टनुसार आयपीएल 2023 चा लिलाव 16 डिसेंबर रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 चा आगामी हंगाम देखील वेळेपूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे.



क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात चांगली बातमी म्हणजे यावेळी आयपीएल पुन्हा होम आणि अवे फॉरमॅटमध्ये खेळवले जाईल. कोविडमुळे 2019 पासून क्लोज विंडोमध्ये सर्व सामने खेळवले जात होते. आता सर्व संघ होम आणि अवे मॅचेस खेळणार आहे. यासाठी खेळाडूंचा मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी बंगळुरू येथे होणार आहे.

होम ग्राउंडवर खेळणार संघ
कोविड-19 च्या उद्रेकामुळे 2020 मध्येआयपीएल फक्त काही ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. ही लीग UAE मध्ये दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे बायो बबलमध्ये खेळली गेली. 2021 मध्ये देखील स्पर्धेचे सामने फक्त दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि चेन्नई या चारच शहरात आयोजित करण्यात आले होते. मात्र यावर्षी पुन्हा एकदा सर्व संघांना आपल्या होम ग्राउंडवर अर्धे सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -