Sunday, February 23, 2025
Homeक्रीडाब्रेकींग: भारताने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स..

ब्रेकींग: भारताने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स..


टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज सराव सामना झाला. आजच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 186/7 धावा केल्या होत्या. याबदल्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 7 धावांनी पराभूत झाला. भारताने ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकांत 4 धक्के दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 180 धावांवर बाद झाला.

भारताकडून लोकेश राहुलने आणि सुर्यकुमार यादवने आपला फॉर्म कायम राखत शानदार अर्धशतक केले. लोकेश राहुलने 33 चेंडूंत 57 धावा (3 षटकार आणि 6 चौकार) केल्या. सुर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत 33 चेंडूंत 50 (6 चौकार, 1 षटकार) धावा केल्या. याशिवाय रोहित शर्माने 14 चेंडूंत 15, विराट कोहलीने 13 चेंडूत 19, हार्दिक पंड्याने 5 चेंडूत 2 तर दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 20 धावा, अक्षर पटेल य व अश्विनने 6 धावा केल्या.

प्रत्त्युतरात ऑस्ट्रेलियाला जिकण्यासाठी 187 धावांचे लक्ष्य असताना धावसंख्येची गती संघाने सुरुवातीपासूनच वाढवली. सहज विजय मिळेल अशी परिस्थिती असताना मात्र ऑस्ट्रेलियाने मोहम्मद शमीच्या सुरेख गोलंदाजीमुळे अखेरच्या षटकांत 4 विकेट्स गमावल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाचा 7 धावांनी पराभव झाला. सराव सामना असतानादेखील हा सामना रोमांचक ठरला.

आजच्या सामन्यातील भारतीय संघ:

रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -