ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोमवारी राज्यातील 1079 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार आलं. यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. या निवडणूकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा विचार केला तर यात मविआचं पारडं जड भरलं आहे. राज्या भाजप-शिंदे गट युतीला 352 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे, तर महाविकास आघाडीने 451 जागी विजय मिळवला आहे.
भाजपा – 239
राष्ट्रवादी – 155
ठाकरे गट – 153
काँग्रेस – 143
शिंदे गट – 113
इतर – 295
कुठे कोणाला किती जागा मिळाल्या?
– नंदुरबारमध्ये एकूण 206 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या.
– नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसने 66 तर भाजपने 54 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला.
– शिवसेने 12, शिंदे गट 13, राष्ट्रवादी- 4, तर माकपने 2 ठिकाणी विजय मिळवला.