Sunday, July 27, 2025
Homeतंत्रज्ञान‘एअरटेल’चा बडा धमाका, दिवाळीत लाॅंच केले स्वस्तातील 8 प्लॅन..

‘एअरटेल’चा बडा धमाका, दिवाळीत लाॅंच केले स्वस्तातील 8 प्लॅन..

टेलिकाॅम क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘एअरटेल’ने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीआधीच मोठे गिफ्ट दिलं आहे. एअरटेलने (Airtel) स्वस्त किंमतीत 8 ब्रॉड बँड प्लॅन लाँच केले आहेत.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

एअरटेल बेसिक प्लॅन

या प्लॅनची किंमत 499 रुपये असून, त्यात 40 एमबीपीएस इंटरनेट स्पीड मिळेल. सोबत कंपनीकडून वाय-फाय राउटर फ्री दिला जात आहे. या प्लॅनमध्ये 1 वर्षाची एक्सट्रिम प्रीमियम व विंक मेंबरशिप फ्री मिळते.

बेसिक + टीव्ही

प्लॅनची सुरुवात 699 रुपयांपासून होते. या प्लॅनमध्ये 40 एमबीपीएस इंटरनेट स्पीड, तसेच वाय-फाय राउटर फ्री मिळतो. तसेच, एक वर्षासाठी डिस्ने+हाॅटस्टार, 10 ओटीटी अॅप्स, 300 हून जास्त टीव्ही चॅनेल फ्री मिळतात. 30 दिवसासाठी फ्री ट्रायल मिळते.

स्टँडर्ड प्लॅन

हा प्लॅन 799 रुपये प्लस टॅक्स किंमतीचा आहे. त्यात 100 एमबीपीएस इंटरनेट स्पीड, सोबत वाय फाय राउटर फ्री मिळतो. तसेच, 1 वर्षासाठी एक्स्ट्रिम प्रीमियम, विंकचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. मात्र, त्यात 30 दिवसांची फ्री ट्रायल मिळत नाही.

इंटरटेनमेंट प्लॅन

या प्लानची किंमत 999 रुपये प्लस टॅक्स दर महिना आहे. यात 200 एमबीपीएस इंटरनेट स्पीड, फ्री वाय फाय राउटर, तसेच 30 दिवस फ्री ट्रायल मिळते.

इंटरटेनमेंट+ टीव्ही
हा प्लॅन 1099 रुपये प्लस टॅक्स किंमतीचा आहे. त्यात 200 एमबीपीएस इंटरनेट स्पीड, फ्री राउटर मिळते. एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार, 10 ओटीटी अॅप्स, 300 हून जास्त टीव्ही चॅनेल मिळतात. 30 दिवसांच्या फ्री ट्रायल सोबत प्लॅन येतो.

प्रोफेशनल प्लॅन

या प्लॅनची किंमत 1498 रुपये प्लस टॅक्स आहे. यात 300Mbps स्पीडने इंटरनेट, 1 वर्षासाठी एक्स्ट्रीम प्रीमियम, विंकचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

प्रोफेशनल+टीव्ही

प्लॅनची किंमत 1599 रुपये प्लस टॅक्स आहे. यात 300Mbps स्पीड इंटरनेट, फ्री राउटर, 1 वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार, 10 ओटीटी अॅप्स, 300 हून जास्त टीव्ही चॅनेल मिळतात.

प्रीमियम प्लॅन

हा प्लॅन 1599 रुपयांचा असून, यात 300Mbps इंटरनेट स्पीड, राउटरस तसेच 1 वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार, 10 ओटीटी अॅप्स, ३०० हून जास्त टीव्ही चॅनेल मिळतात. मात्र, 30 दिवसांची फ्री ट्रायल मिळत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -