सोशल मीडियाचा वापर करून अनेक जण आपली दैनंदिन परिस्थिती सोशल मीडियावर व्यक्त करत असतात. फोटो, व्हिडीओ, स्टेटस च्या रूपात किंवा स्टोरीजच्या रुपात हे सगळं काही होत असतं. आपल्या कुटुंबातील मुलं किंवा मुली हे स्मार्टफोन सर्रास वापरत असतात.
पालक वर्ग आपल्या मुलांविषयी सतत चिंतेत असतो. यामुळे गुगलने एक खास बातमी पालकांसाठी आणली आहे. जर आपले मुलं-मुली स्मार्टफोनचा अधिक वापर करत असतील तर या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुगलने 2017 मध्ये आणलेल्या ‘Family Link App’ या ॲपमध्ये नवीन फिचर्स समाविष्ट करून पुन्हा एकदा नव्या रूपात आणले आहे.
फॅमिली लिंक ॲप ची खास वैशिष्ट्ये:
▪️ पालकांना त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी हे ॲप उपयोगी पडणार आहे. याद्वारे पालक मुलांचे फोन किंवा टॅब्लेट लॉक करू शकतात.
▪️ पालक मुलांना फोन वापरण्यासाठीची वेळदेखील ठरवू शकतात.
▪️ लोकेशन टॅब: पालकांच्या फॅमिली लिंक अॅपमध्ये मुलांच्या फोनचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे. बॅटरी लेव्हलदेखील दाखवली जाणार आहे.
▪️ मुले जेव्हा शाळेतून बाहेर पडतील तेव्हा पालकांना गुगल मॅपद्वारे त्याचा अलर्ट मिळणार आहे.
▪️ मुलांच्या फोनवर येणाऱ्या सर्व सूचनांची माहिती पालकांना या अॅपमध्ये समजणार आहे. पालकांना अशा प्रकारे नियंत्रण ठेवता येणार आहे.



