Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ आजपासून नाईट लँडिंगसाठी सज्ज

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ आजपासून नाईट लँडिंगसाठी सज्ज

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गेल्या कित्येक दिवसापासून प्रतीक्षेत असलेली विमानसेवेची नाईट लँडिंग सुविधा आज पासून कोल्हापूर मध्ये सुरू होत आहे , विमानतळावर आज रात्रीपासून खाजगी विमान अथवा इतर विमाने येण्यास कोणतीही हरकत नसल्याचे विमानतळ प्रतिकरणाचे अधिकारी अनिल शिंदे यांनी यावेळी सांगितले.



विमानतळाची धावपट्टी कमी असल्याकारणाने नाईट लँडलाईनिंग सुविधेला अडचणी येत होत्या. पण विमानतळाची पूर्वीची धावपट्टी 1370 मीटर होती ती वाढवून आता 1930 मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे नाईट लँडिंग सुविधेला कोल्हापूर विमानतळ सज्ज झाले आहे. विमानतळावर आज रात्री कोणतेही विमान येणार नसून इथून पुढच्या काळात रात्री विमानाने कोल्हापूरला येणाऱ्यांच्यासाठी या नाईट लँडिंग सुविधाचा नक्कीच फायदा होणार आहे.

नाईट लँडिंगचा उद्योजकांना होणार फायदा
कोल्हापूरला गोकुळ शिरगाव एमआयडीसी, शिरोली एमआयडीसी ,कागल पंचतारांकित औद्योग वसाहत मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये दिवसागणित परकीय गुंतवणूक वाढत आहे. त्याचबरोबर बरेच उद्योजक इतर देशातील उद्योजकांचे बरोबर भागीदारी करून या ठिकाणी उद्योग वाढत आहेत. त्यामुळे या नाईट लँडिंगचा कोल्हापुरातील औद्योग वसाहतींना खूप मोठा फायदा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -