Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानइलेक्ट्रिक बाइक पेट घेण्यामागचं कारण आलं समोर, जाणून घ्या काय म्हटलंय अहवालात

इलेक्ट्रिक बाइक पेट घेण्यामागचं कारण आलं समोर, जाणून घ्या काय म्हटलंय अहवालात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सध्या देशात इलेक्ट्रिक बाइकचे बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली वाढ याला कारणीभूत आहे. पेट्रोल डिझेलच्या दराने शंभरी पार केल्याने लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले आहे. वापरण्यास सोपी तसेच पेट्रोल-डिझेलच्या खर्चापेक्षा परवडणारी असल्याने इलेक्ट्रिक बाइक खरेदीला पसंती मिळत आहे. मात्र, इलेक्ट्रिक बाइकचे ज्याप्रमाणे फायदे आहे त्याच प्रमाणे या बाइकमधील उणीव देखील समोर येत आहे. त्यातलीच महत्त्वाची एक उणीव म्हणजे इलेक्ट्रिक बाइकने पेट घेण्याची समस्या. सध्या इलेक्ट्रिक बाइकने पेट घेतल्याच्या अनेक घटना घडत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक का पेट घेते जाणून घेऊया या विषयी…



इलेक्ट्रिक बाइक पेट घेण्याचे हे आहे कारण
इलेक्ट्रिक बाइकला लागणाऱ्या आगीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचे कारण शोधण्यासाठी एक केंद्रीय समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार, बाइकची बॅटरी डिझाइन आणि मॉड्यूल तसेच इलेक्ट्रिक बाइकच्या संपूर्ण बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये (बीएमएस) गंभीर समस्या आहे. यामुळे बॅटरी जास्त गरम होत आग लागते. काही इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्या त्यांच्या उत्पादन खर्चाची किंमत कमी करण्यासाठी कमी दर्जाचे साहित्य वापरत आहे. त्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

बॅटऱ्या या करणामुळे तापतात
बॅटऱ्यांचे बहुतांश उत्पादन चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये होते. इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरली जाणारी बॅटरी प्लास्टिकच्या कॅबिनेटसह असते. बॅटरी गरम झाल्याने प्लास्टिक आणि यासोबत जोडलेले सर्किटही वितळू लागते. यामुळे आग लागण्याची समस्या निर्माण होते. यात लिथियम आयर्नच्या बॅटऱ्या अधिक उष्णता सोडतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -