Saturday, August 2, 2025
Homeक्रीडाविराट कोहलीचा ‘आयसीसी’कडून खास गौरव, महिलांमध्ये ‘या’ खेळाडूला पुरस्कार..!

विराट कोहलीचा ‘आयसीसी’कडून खास गौरव, महिलांमध्ये ‘या’ खेळाडूला पुरस्कार..!

किंग कोहली.. अर्थात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याला मानाच्या ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. टी-20 वर्ल्ड कपमधील धडाकेबाज कामगिरीमुळे विराटला ‘आयसीसी’ने हा पुरस्कार दिला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘आयसीसी’कडून दर महिन्याला ‘प्लेअर ऑफ द मंथ’चा पुरस्कार देण्यात येतो.

या खेळाडूंना नामांकन

ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटसोबत झिम्बाब्वेचा सिकंदर रझा व दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांची नावे नाॅमिनेट झाली होती. मात्र, प्रेक्षकांनीही विराटला पसंती दिल्याने त्याला हा पुरस्कार मिळाला.

महिला क्रिकेटमध्ये भारताची जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा व पाकिस्तानच्या निदा दार यांना नामांकन मिळाले होते. त्यात पाकिस्तानी खेळाडू निदा दार हिने ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार मिळवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -