Sunday, February 22, 2026
Homeकोल्हापूरगडहिंग्लज गोडसाखर निवडणूक : मोठ्या मताधिक्याने मुश्रीफ पॅनेल आघाडीवर

गडहिंग्लज गोडसाखर निवडणूक : मोठ्या मताधिक्याने मुश्रीफ पॅनेल आघाडीवर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या फेरीअंती माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ व डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील छ. शाहू समविचारी आघाडीला मतदारांचा स्पष्ट कल दिसून येत आहे. सर्व गटांमध्ये या आघाडीचे उमेदवार हजारहून अधिक आघाडीवर आहेत. संस्था गटात आ. मुश्रीफ यांच्या छ. शाहू आघाडीचे सोमनाथ अप्पी पाटील यांनी आ. राजेश पाटील यांच्या श्री काळभैरव आघाडीचे उमेदवार व कामगार नेते शिवाजी खोत यांना १६२ मतांनी पराभूत केले आहे. खोत यांना ३७ मते मिळाली तर १ मत बाद झाले.



या निवडणुकीत राष्ट्रवादीचीच दोन पॅनेल एकमेकासमोर उभी ठाकली होती. आ. हसन मुश्रीफ यांनी माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण यांना सोबत घेत छ. शाहू समविचारी आघाडी केली होती. या विरोधात चंदगडचे आ. राजेश पाटील, माजी आ. अॅड. श्रीपतराव शिंदे, माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, कामगार नेते शिवाजी खोत यांच्या श्री काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडीने टक्कर दिली.



पहिल्या फेरीअखेर १ ते ३४ केंद्रात आतापर्यंत मतमोजणी झाली. यामध्ये मिळालेली मते खालीलप्रमाणे –

कौलगे- कडगाव गट

एकूण मतदान ७८४९, वैध ७६२६, अवैध २२३ डॉ. प्रकाश शहापूरकर (छ. शाहू आघाडी) : ४९१३ बाळासाहेब देसाई (छ. शाहू आघाडी) : ४५६६ विश्वनाथ स्वामी (छ. शाहू आघाडी) : ४४२२ सुजित देसाई (काळभैरव आघाडी) : २७६७ अशोक देसाई (काळभैरव आघाडी) : २७४२ विकास पाटील (काळभैरव आघाडी) २५६२

गडहिंग्लज- हनिमनाळ गट –
एकूण मतदान ७८४९, वैध ७५५१, अवैध २९८ अशोक मेंडूले (छ. शाहू आघाडी) : ४४५९ शिवराज पाटील (छ. शाहू आघाडी) : ४४५० अक्षयकुमार पाटील (छ. शाहू आघाडी) : ४४०२ संग्रामसिंह नलवडे (काळभैरव आघाडी) : २८७७ शिवाजी खोत (काळभैरव आघाडी) : २७५५ विजयकुमार मोरे (काळभैरव आघाडी) : २७२३ राजेंद्र तारळे (अपक्ष) : २१०

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -