मिरजेत एक नागरिक दयानंद नाईक यांच्या हाॅस्पिटलमध्ये त्याला दाखविण्यासाठी गेला असता त्या नागरिकांला समर्थ आयुर्वेदिक मेडीकल यांच्या एजंटाने घेरुन त्या नागरिकास सांगितले की हाॅस्पिटल मध्ये दाखविण्यापेक्षा मी तुम्हाला आयुर्वेदिक औषध देतो तुमचा आजार आहे तो लगेच बरा होईल असे सांगून मिरज बसस्थानक येथील समर्थ आयुर्वेदिक मेडीकल मध्ये घेऊन आला.त्यानंतर त्या मेडीकल मध्ये ७० ते १२० रुपये किंमतीचे तेलाची बाटली ही ४ हजार २०० रुपयाला विकून त्याला फसविण्यात आले.
त्यांच वेळेला शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या नागरिकांला घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी सहकार्य केले.तसेच शिवसेनेच्या मिरज शहर महिला पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की समर्थ आयुर्वेदिक मेडीकल हे फसवेगीरीचे मेडीकल आहे.त्याच्याकडून कोणीही औषधे घेऊ नये आणि नागरिकांनी पण कोणते औषध कसे घ्यावे हे चेक करुन घेण्याचे आवाहन केले आहे.तसेच समर्थ मेडीकल ची ही फसवणूकीची दुसरी वेळ आहे.परवा ही एका महिलेची फसवणूक याच मेडीकल मध्ये झाली होती.