Tuesday, August 5, 2025
Homeक्रीडाविराट-हार्दिकची फिफ्टी, टीम इंडियाचे इंग्लंडसमोर 169 धावांचे आव्हान

विराट-हार्दिकची फिफ्टी, टीम इंडियाचे इंग्लंडसमोर 169 धावांचे आव्हान

टी-20 वर्ल्‍ड कप 2022 च्या दुसऱ्या सेमिफायनल लढतीत हार्दिक पंड्याच्या 33 चेंडूत 63 धावा आणि विराट कोहलीच्या 50 धावांच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 6 विकेटच्या नुकसानावर 168 धावा केल्या. हार्दिकने पाच षटकार आणि चार चौकारचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर विराट कोहलीने देखील संकटांत सापडलेल्या आपल्या संघाला बाहेर काढले. कोहलीने 40 चेंडूत 50 धावांचं योगदान दिलं.

दुसरीकडे, क्रिस जोर्डने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. क्रिसमुळेच काही काळ भारतीय संघ दबावात होता.तर क्रिस वोक्‍सने दोन विकेट घेतल्या. इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि KL राहुल ही सलामी जोडी मैदानात आली. पण, राहुलच्या रुपात टीम इंडियाला पहिला झटका बसला. राहुल 5 धावांवर खेळत असताना क्रिस वॉक्स याने त्याला आऊट केलं. जोस बटलरने राहुलचा झेल घेतला. त्यानंतर रोहित शर्मा देखील तंबूत परतला. त्यानंतर क्रीजवर आलेल्या सूर्यकुमार यादवला अवघ्या 14 धावांवर इंग्लंडचा गोलंदाज आदिल रशीदने आऊट केले. क्रीजवर विराट कोहली आणि हार्दिक पंड्या आहे. दोन्ही फलंदाजांवर शानदार खेळाची अपेक्षा आहे.

दरम्यान, इंग्लंडने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. डेविड मलान आणि मार्क वुड या लढतीत दिसणार नाही. तर फिल सॉल्ट आणि ख्रिस जॉर्डनला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, टीम इंडियांने आपल्या प्लेइंग XI मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -