इंग्लंडची वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक, टीम इंडियाचा 10 विकेट्स राखून पराभव
ॲलेक्स हेल्स आणि जोश बटलर यांनी केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर इंग्लंडने टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये दारुण पराभव केला. या विजयासह इंग्लिश संघाने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. आता फायनलमध्ये त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. 13 नोव्हेंबरला रोजी मेलबर्न येथे रंगणार आहे. टीम इंडियाच्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या ओपनर्सनी भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या.
टी 20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना इंग्लंडशी होत आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकला असून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाखराब सुरुवातीनंतर 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 168 धावा केल्या. विराट कोहली (50) आणि हार्दिक पंड्या (63) यांनी केलेल्या झुंझार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लिश संघासमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य ठेवले .
इंग्लंडच्या डावाची चांगली सुरुवात
प्रत्युत्तरात इंग्लंडच्या बटलर आणि हेल्स या सलामीवीर जोडीने आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. बटलरने डावाच्या पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारला तीन चौकार ठोकले. त्यानंतर दुस-या आणि तिस-या षटकात चौकार-षटकार फटकावले. या जोडीने पॉवर प्ले च्या षटकांचा पुरेपुर फायदा उठवला आणि भारतीय गोलंदाजांकडून धावा वसूल केल्या. 5 व्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर झळकावले. पॉवर प्ले ची सहा षटके संपली तेव्हा त्यांची धावसंख्या बिनबाद 63 होती. यानंतर आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन अॅलेक्स हेल्सने 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यावेळी इंग्लंडची धावसंख्या बिनबाद 84 होती. 10 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हेल्सने हार्दिक पंड्याला षटकार खेचून संघाचे शतक धावफलकावर झळकावले. याचबरोबर बटलर-हेल्स जोडीची पहिल्या विकेट्साठी शतकी भागिदारीही पूर्ण झाली.
भारताची सुरुवात खराब
दरम्यान, भारताची सुरुवात खराब झाली. दुस-याच षटकार केएल राहुल बाद झाला. यावेळी संघाची धावसंख्या 9 होती. यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. याने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने डाव सांभाळला आणि पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये संघाला 38 धावसंख्येपर्यंत पोहचवले. या दरम्यानच्या खेळात रोहित शर्माला जीवदान मिळाले. 4.4 व्या षटकात कुरनने फेकलेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू रोहितने फटकावला. चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या उजवीकडे गेला. हवेत होता. त्यावेळी ब्रुकने डायव्हिंग करून तो पकडण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या तळहातावर आदळून मैदानावर पडला आणि वेगाने पुढे गेला. त्यानंतर आठव्या षटकात रोहित-विराट जोडीने संघाच्या 50 धावा पूर्ण केल्या.
केएल राहुल फेल, चाहते निराश…
केएल राहुल आणि रोहित शर्माने टीम इंडियाला संयमी सुरुवात करून दिली. डावाच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर केएल राहुलने चौकार मारला. बेन स्टोक्सचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडला होता. राहुलने बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या गॅप मधून चेंडू सीमापार पाठवला. पहिल्या षटकात भारताने सहा धावा काढल्या. मात्र, दुस-या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भारताला पहिला झटका बसला. ख्रिस वोक्सने केएल राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वोक्सने पाचव्या स्टंपवर बॅक ऑफ लेंथ बॉल टाकला. त्याचवेळी चेंडूला अतिरिक्त बाउंस मिळाला. राहुलने बॅकफूटवर जात कट करण्याचा प्रयत्न केला परंतु अतिरिक्त बाऊन्समुळे त्याच्याकडून चूक झाली. चेंडू बॅटची कडा घेऊन विकेटकीपर बटलरकडे गेला आणि इंग्लंडला पहिले यश मिळाले. हताश झालेला राहुल जड पावलांनी पॅव्हेलियनकडे निघून गेला.
रोहित शर्मा मोठ्या खेळीपासून वंचित…
नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर भारताला दुसरा धक्का बसला. ख्रिस जॉर्डनने इंग्लंडला दुसरे यश मिळवून दिले. त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहितला सॅम करणने झेलबाद केले. रोहित 27 चेंडूत 28 धावा करून तंबूत परतला. यादरम्यान भारतीय कर्णधाराने चार चौकार मारले. यावेळी भारताची धावसंख्या नऊ षटकांत दोन बाद 57 धावा होती. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव क्रीझवर आला. रोहितला मिळालेल्या जीवदानचा फायदा घेता आला नाही. त्याला 28 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. जॉर्डनने चौथ्या स्टंपवर गुड लेन्थ फॉरवर्ड चेंडू फेकला. चेंडूच्या खेळपट्टीवर पडताच तो मिडविकेटवर भिरकावण्याचा प्रयत्न केला. चेंडू डीप मिडविकेट फॉरवर्डला गेला. इथे करणने झेल घेतला. रोहित-विराट जोडीने तिस-या विकेटसाठी 47 धावांची भागिदारी केली.
अॅडलेडमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघ पराभूत
अॅडलेडमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचे रेकॉर्ड खराब आहे. आतापर्यंत येथे 11 टी-20 सामने खेळले गेले आहेत. या दरम्यान नाणेफेक हरलेल्या संघाने प्रत्येक वेळी सामना जिंकला आहे. भारताने येथे दोन टी 20 सामने खेळले आहेत – 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध. दोन्हीमध्ये भारताने नाणेफेक गमावून सामना जिंकला.