Monday, August 4, 2025
Homeक्रीडादुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंड-पाकिस्तान सज्ज, पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंड-पाकिस्तान सज्ज, पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

ताजी बातमी ऑनलाईन टीम

रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार्‍या T20 विश्वचषक फायनलमध्ये विजय मिळवण्यासाठी इंग्लंड आणि पाकिस्तान दोन्ही संघातील खेळाडू सज्ज आहेत. सध्या प्रडंट फॉर्मात असलेली टीम इंग्लंड आणि साखळी सामन्यापासून नशीबाच्या जोरावर फायनलपर्यंत धडक मारलेल्या पाकिस्तान संघात हा सामना होणार आहे. हा विश्वचषक जिंकून पाकिस्तान क्रिकेटच्या ‘हॉल ऑफ फेम’मधील महान क्रिकेटपटू इम्रान खानसोबत सामील होण्याचा बाबर आझमचा प्रयत्न असेल. तर जोश बटलरच्या नेतृत्त्वातील इंग्लंड संघ आपला दुसरा विश्वचषक उंचवण्यासाठी मैदानात उतरेल.



पाकिस्तानचा नाट्यमय प्रवास
या स्पर्धेतील पाकिस्तानाचा प्रवास एखाद्या नाट्यमय आणि शक्यतांनी भरलेल्या ‘स्क्रिप्ट’प्रमाणे होता. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताकडून पराभव स्विकारावा लागलेल्या पाकिस्तानाला त्यानंतर झिम्बाब्वे सारख्या कमी अनुभवी संघाकडून देखील लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. या दोन सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान जवळपास स्पर्धेबाहेर पडला असे ग्रहीत धरले गेले. मात्र साखळी फेरीच्या अखेरच्या दोन सामन्यानंतर नाट्यमयरित्या पाकिस्तानचं स्पर्धेत पुनरागमन झालं आणि दक्षिण आफ्रिकेला नेदरलँडने पराभूत केल्यानंतर पाकिस्तानला अवघ्या 6 गुणांवरच सेमीफायनलची लॉटरी लागली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -