इंग्लंडने टी-20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मॅटमधील विश्वविजेतेपद पटकावण्याची इंग्लंडची ही दुसरी वेळ आहे. मेलबर्नमध्ये रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकात केवळ 137 धावा केल्या. प्रत्युत्तरात बेन स्टोक्सच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने विजेतेपद पटकावले. यापूर्वी 2010 मध्ये इंग्लिश संघाने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डावाची सुरुवात केली आणि दोघांनी 4 षटकात 29 धावा जोडल्या. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला सॅम करनने त्रिफळाचीत केले. यानंतर बाबरने मोहम्मद हरिसच्या साथीने डाव सावरला आणि पॉवरप्लेपर्यंत संघाला 39 धावांपर्यंत नेले. मात्र आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हॅरिसही 8 धावा करून बाद झाला.
यानतंर शान मसूद आणि बाबर आझम यांनी संघाला 11 षटकांत 84 धावांपर्यंत पोहोचवले. मात्र बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाबर आझम आदिल रशीदच्या चेंडूवर झेलबाद झाला. याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इफ्तिखार अहमद देखील बाद झाला. शान मसूदने 38 धावा केल्या. अखेरीस शादाब खानच्या 20 धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्तानला 137 धावांच्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून सॅम करनने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 12 धावा देत 3 बळी घेतले, याशिवाय आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
इंग्लंडने दुसऱ्यांदा जिंकला टी-20 विश्वचषक, हे आहेत विजयाचे हिरो
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -