Wednesday, August 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : रस्ते खड्ड्यात गेल्याने आम आदमी पार्टीतर्फे महानगरपालिकेच्या परिसरात उलटी रिक्षा...

कोल्हापूर : रस्ते खड्ड्यात गेल्याने आम आदमी पार्टीतर्फे महानगरपालिकेच्या परिसरात उलटी रिक्षा फिरवत अनोखे आंदोलन

कोल्हापुरातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांविरोधात आणि महानगरपालिकेमध्ये सुरू असलेली टक्केवारी यासह विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या ( Aam Aadmi Party ) वतीने महानगरपालिकेच्या भोवती उलटी रिक्षा चालवत अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी महानगरपालिकेच्या समोरून रिक्षा उलटी चालवत चालकांनी उलट्या पद्धतीने विचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांसाठी क्वालिटी कंट्रोल प्लॅन जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

कोल्हापूरात आम आदमी पार्टीच्या वतीने आजपासून ‘जागर’ आंदोलन

क्वालिटी कंट्रोल प्लॅन जाहीर करण्याची मागणी – कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा प्रश्न हा काय नवीन नाही. शहरातील निम्म्याहून जास्त रस्ते हे खड्ड्यात गेले असून येथे सध्या महानगरपालिकेच्या वतीने पॅचवर्कचे काम सुरू आहे. मात्र हे काम देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी महापालिकेकडे कोणताही क्वालिटी कंट्रोल प्लॅन उपलब्ध नसल्यामुळे केवळ काहीच महिन्यात रस्ते खराब होत आहेत. महापालिकेत चालणारी टक्केवारी देखील सुमार रस्त्यांसाठी कारणीभूत आहे, असे म्हणत शहरात होणारे रस्ते दर्जेदार व टिकाऊ व्हावेत यासाठी महापालिकेने क्वालिटी कंट्रोल प्लॅन जाहीर करावा, वॉर्ड निहाय नागरिकांची देखरेख समिती करावी आदी मागण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आज पासून ‘जागर’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आम आदमी पार्टीच्यावतीने जागर आंदोलन – आज आंदोलनाच्या पहिल्या दिवशी महानगरपालिकेच्या उलट्या पद्धतीने विचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना समजावण्यासाठी महापालिकेला ‘उलटी’ रिक्षा चालवत प्रदक्षिणा घालून आंदोलनाची सुरुवात केली आहे. या आंदोलनामध्ये शहरातील आम आदमी रिक्षा संघटनेचे रिक्षाचालक महानगरपालिकेच्या भोवती रिक्षा उलटी चालवत महानगरपालिकेचा निषेध केला आहे. जोपर्यंत शहराच्या रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून प्रस्तावित 100 कोटीचा निधी महापालिकेकडे वर्ग होत नाही तोपर्यंत हा जागर सुरूच राहणार असल्याचे, आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -