जिओने काही दिवसांपूर्वी डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रीप्शन प्लॅन बंद केले आहेत. प्रीपेड आणि पोस्टपेड पोर्टफोलियोमधून ते सर्व प्लॅन्स काढून टाकण्यात आले ज्यात डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रीप्शन मिळत होते.यापैकी दोन प्लॅन्स असेही होते ज्यात याचे प्रीमियम सबस्क्रीप्शन मिळत होते.
जिओने आता हे सर्व प्लॅन्स आपल्या पोर्टफोलियोमधून काढून टाकले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना कोणत्याही रिचार्ज प्लॅनसोबत डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन मिळणार नाही.
आता तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टार प्लॅन हवा असेल तर एअरटेल किंवा व्हीआयचे पोर्टफोलियो बघावे लागतील. कंपनी असे आपल्या इन-हाऊट अॅपमुळे करत आहे. कंपनी डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये जास्त गुंतवणूक करत आहे. त्यामुळे डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन देत नाही. मात्र ग्राहकांना रिचार्जसोबत जिओ अॅप्सचे सबस्क्रीप्शन मिळणार आहे.
जिओ सध्या कोणतेही ओटीटी सबस्क्रीप्शन देत नसले तरी लवकरच कंपनी आपल्या पोर्टफोलियोमध्ये नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म जोडणार आहे.
जिओने कोणते प्लॅन्स काढून टाकले आहेत ?
कंपनीने १४९९ आणि ४१९९ हे दोन प्लॅन्स काढून टाकले आहेत. या दोन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना डिस्ने प्लस हॉटस्टार प्रीमियम सबस्क्रीप्शन मिळत होते.
१ हजार ४९९ च्या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा प्रतिदिन, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग हे फायदे मिळत होते. यात डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रीप्शन १ वर्षासाठी मिळत होते. याची वैधता ८४ दिवसांची होती.
हे सर्व फायदे ४१९९मध्येसुद्धा मिळत होते. यात २जीबीऐवजी ३ जीबी डेटा मिळत असे. तसेच जिओ अॅप्सचे सबस्क्रीप्शन मिळत असे.