ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूरची अंबाबाई, झणझणीत मिसळ, रंकाळा, पन्हाळा हे समद जगाला ठाव हाय.. पण फुटबॉल म्हंजे कोल्हापुरच्या पेठा पेठातल्या लोकास्नी खुळ करणारा खेळ हाय.. आता तुम्ही म्हणाल आता अस काय झालं ह्या फुटबॉल पायी.. अवो काय झालं काय म्हणता.. त्यो यावर्षीचा ‘फिफा वर्ल्डकप’ हाय त्या कतार मंदी पण जणू काय कोल्हापुरातच ह्यो वर्ल्डकप होणार हाय अस मंडळाच्या पोरांनी जोरदार नियोजन केलया…
त्यामुळच एका कोल्हापुरी गड्यान आपल्या पोरग्याच्या पाचवीलाच थेट फुटबॉलच पुजला.. काय म्हणणार ह्यास्नी आता तुम्ही… आवो काय बी म्हणू शकत नाही तुम्ही कारण त्यांनी जे केलया तेच घडत बघा इथ.. पोरग रांगु लागल की पार म्हातारं हुइस्तोवर त्याला फुटबॉलचाच नाद लागतुया…