ताजी बातमी ऑनलाइन टीम
श्री जगन्नाथ मंदिर हे 13 व्या शतकातील प्रसिद्ध मंदिर आहे. 1 जानेवारी 2023 पासून मंदिरांत स्मार्टफोन नेण्यास निर्बंध लागू करण्यात येणार आहे. स्मार्टफोन बंदीचा निर्णय भाविकांसह मंदिरातील सेवेकरी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी देखील लागू राहिल.
आदेशानुसार, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश करण्याआधी सेवाकरीकडे आपला स्मार्टफोन जमा करावा लागणार आहे.भाविकांचे स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक वीर विक्रम यादव यांनी दिली आहे.
मंदिर प्रशासनाचे अधिकारी, सेवेकरी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची सुविधा नसलेले फीचर फोनचा वापर करू शकतात. सेवेकरी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी देखील हा निर्णय लागू राहाणार असल्याचे श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे.
मोठा निर्णय! 1 जानेवारीपासून ‘या’ प्रसिद्ध मंदिरात स्मार्टफोन नेण्यास बंदी!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -