राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत उघडकीस आली आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्यानं 700 जणांची प्रकृती बिघडली.
सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर बहुतांश जणांना डिस्चार्ज देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा काल रात्री लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. बहुतांश जणांना शहरातील एमजीएमसह विविध रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.