ताजी बातमी ऑनलाईन टीम
हेरले : अचानक लागलेल्या आगीत इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक अर्धवट जळाली. हेरले (ता. हातकणंगले) येथे दिशा पेट्रोल पंपासमोर आज, बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत इलेक्ट्रिक बाईकचे मोठे नुकसान झाले.
मुकेश दत्तात्रय सुतार यांनी ९ ते १० महिन्यापूर्वी सांगली येथून इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक खरेदी केली होती. ते आ इचलकरंजीहून कोल्हापूरला कामानिमित्त येत होते. दरम् हेरले फाटा येथे गाडीतून अचानक धूर यायला सुरु झाला.
मुकेश यांनी गाडी रस्त्याकडेला घेतली. मात्र आगीने पेट घेतला. पेट्रोल पंपावरील अग्नीशमन यंत्र आणून राजू चौ यांनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीत बाईक अर्धवट जळून मोठे नुकसान झाले.