ताजी बातमी ऑनलाइन टीम
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच्या या चित्रपटामुळे शाहरुख चर्चेत असताना. दुसरीकडे त्याचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून नोरा फतेहीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातमीमुळे चर्चेत होता. तर आता पुन्हा एक आर्यन खान चर्चेचा विषय ठरला आहे. आता आर्यन एका पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करतोय ही बातमी समोर आली आहे.
नोरा फतेही आणि आर्यन खान यांचे दुबईतील पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या बातमीवर आर्यन किंवा नोरा कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. इतक्यात आर्यन एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाला आहेत. आर्यन एका पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करतोय असे म्हटले जात आहे. आर्यनचा पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांचा हा फोटो पाहून नेटकरी अंदाज लावत आहेत की ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.
आर्यन आणि सादियाचा हा व्हायरल फोटो फिल्मी वेव्ह या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी आर्यननं पांढऱ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. तर सादिया खाननं काळ्या रंगाचा ड्रेस आणि जॅकेट परिधान केलं आहे. आर्यन आणि सादियाचा हा फोटो कुठला आहे आणि ते दोघं कोठे भेटले होते हे अद्याप समोर आले नाही. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर आर्यन नक्की कोणाला डेट करतोय असा प्रश्न पडला असून नोरा आणि सादियाचं नाव समोर आलं आहे.
शाहरुखचा लेक Aryan Khan करतोय ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -