Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात नंगानाच खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा उर्फीला थेट इशारा

महाराष्ट्रात नंगानाच खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा उर्फीला थेट इशारा

आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असलेल्या उर्फी जावेदने भाजप नेत्या चित्रा वाघ यांना ट्विट करत डिवचले. तिच्या ट्विटनंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा उर्फीवर संताप व्यक्त केला आहे. “तुम्ही चार भितींच्या आतमध्ये काय करता, हा तुमचा प्रश्न आहे. पण, सार्वजनिक ठिकाणी आणि समाजात असल्यावर तुम्हाला कपड्यांचं भान असायला हवं पाहिजे. मुली जीन्स, टॉप्स, फ्रॉक घालतात. त्या उघड्या-नागड्या फिरत नाहीत. ते कपडे आणि ही बाई नंगानाच करत आहे, याच्यात फरक आहे. सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करणार असाल तर खपवून घेणार नाही,” असा इशारा वाघ यांनी दिला.

चित्रा वाघ यांनी उस्मानाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या कि, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती आपण सर्वांनी डोळ्याला झापडे लावून सर्व सहन करायचे? उद्या चौका चौकात अशा प्रकारचे नंगानाच सुरु होण्यास वेळ लागणार नाही आम्ही विरोध केला तर. म्हणून आम्ही हे खपवून घेणार नाही. आम्ही अशा गोष्टींना विरोध हा करणारच.

यावेळी चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, चाकणकरताई तुमचा अभ्यास किती आहे, तो पेपर तुम्ही सुप्रियाताईंच्या समोर सोडवा. आम्हाला सांगायची गरज नाहीये. तुमचा अभ्यास बघून तुमच्या पक्षाने तिथं बसवलं नाही. तुमचा अभ्यास किती आहे ते सुप्रिया सुळे यांना जाऊन सांगा. आमचा अभ्यास पक्का आहे. तुम्ही नोटीस पाठवली आम्ही उत्तर पाठवलं आहे.

जे काही सल्ले द्यायचे असतील ते तुमच्या घरात जाऊन द्या. समाजस्वस्थ्याचं कारण असतं तिथं राजकारण करायची गरज नसते. जे राजकारण करण्यासाठी उड्या मारतायत त्यांना आम्ही गुळ-खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं. त्यांच्या नेत्या सांगत आहेत की, थांबवा. सुप्रियाताई ही विकृती थांबवण्यासाठी आम्ही लढा सुरू केला आहे. आम्हा खूप वाईट याचं वाटतं तुम्ही ज्या बाईला बसवलं आहे तिला यामध्ये विकृती दिसत नाही, असे वाघ यांनी यावेळी म्हंटले.

नेमकं काय म्हंटल आहे उर्फीन ट्विटमध्ये?
उर्फीने एक फोटो ट्वीट केला आहे. त्यावर तिने चित्रा वाघ यांना टॅग करत लिहलं की, “लेकिन अभी बोहोत सुधार बाकी है. सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू.” तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असं उर्फीने म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -