वारणानगर येथील तरुण विद्यार्थ्यांने अभ्यासाच्या तणावाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रेयस श्रीकांत बुढ्ढे (वय २२) रा. वारणानगर ता. पन्हाळा असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून या बाबतची वर्दी त्याचे चुलते जगनाथ शिवलिंग बुढ्ढे यांनी कोडोली पोलिसात दिली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, श्रेयस याचे मुळगाव ऐतवडे खुर्द (ता वाळवा) असे आहे. वारणानगर येथील सिमेंट चाळीत वडीलांसोबत राहत होते. तो इंजिनीअरिंग च्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याने रहात्या घरी सोमवारी सायंकाळी स्लॅबच्या लोखंडी हुकास गळफास लावून आत्महत्या केली अभ्यासाच्या तणावामुळे आलेल्या नैराशामुळे त्याने आत्महत्या केली असणेची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल काटकर हे करीत आहेत.