Sunday, February 22, 2026
Homeकोल्हापूरKolhapur : काखेत नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जवानाची आत्महत्या

Kolhapur : काखेत नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जवानाची आत्महत्या

काखे (ता पन्हाळा) येथे लष्करी जवानाने रहात्या घरी गुरुवारी दुपारी नॉयलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सत्यजित महादेव खुडे (वय २८) असे त्याचे नाव असून या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

याबाबतची फिर्याद सत्यजीत चा भाऊ सुनिल यांने कोडोली पोलीसात दिल्यावर या घटनेची नोंद पोलीसानी केलीआहे.. कोडोली पोलीसातून व घटनास्थळा वरून समजलेली माहिती अशी, सत्यजीत हा ६ ते ७ वर्षा पुर्वी भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल झाला होता. पुर्वी त्याची जम्मू येथे नियुक्ती झाली होती. सद्या वडोदरा गुजरात येथे नुकतीच त्याची बदली होऊन तो वडोदरा येथे कर्तव्यावर रुजू होवून एक महिन्याच्या सुट्टीवर दि. १ जानेवारीला काखे येथे गावी आला होता. गेल्या चार वर्षापुर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला दीड वर्षाचा एक मुलगा आहे. सत्यजित यांचे आईवडील आशिक्षित असून घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे . हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत पदवीपर्यतचे सत्यजीतने शिक्षण घेतले होते. पदवी शिक्षणानंतर तो भारतीय लष्करी सेवेत दाखल झाला होता. गुरुवारी दुपारी रहात्या घरी तो माडीवर झोपणेस गेला होता. दुपारी तीनच्या सुमारास त्याची पत्नी उठविणेस गेली असता त्यांना ही घटना लक्षात आली. सत्यजीतला उपचारासाठी तात्काळ कोडोली येथील यशवंत हॉस्पिटल मध्ये दाखल केले परंतु उपचारापुर्वी तो मयत असल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले.

सत्यजित याचा मनमिळावू व शांत स्वभाव असल्याने त्याच्या अशा जाण्यामुळे काखे गावासह परीसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्युची बातमी समजताच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवणेत आले होते. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -