ताजी बातमी ऑनलाईन टीम
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री बिपाशा बासू यांना मुलं झाल्यानंतर गौहर खान यांच्या घरीसुद्धा पाळणा हलणार आहे. आता गौहरनंतर अजून एका अभिनेत्रीकडे आनंदाची बातमी आहे. टीव्ही जगतातील सर्वात प्रसिद्ध कपल दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम हे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चे असतात. नुकतचं शोएबच्या बहिणीचं लग्न झालं. या लग्नातील प्रत्येक क्षणाचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. या दोघांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. अशात चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शोएब इब्राहीमने इन्स्टाग्रामवर गोड बातमी सांगितली आहे. दीपिका कक्कड आई होणार आहे. सोशल मीडियावर सुंदर शब्दात आणि एक खास फोटो शेअर करत त्याने ही बातमी सांगितली आहे
शोएब इब्राहिमने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये पांढरे कपडे घालून दीपिका आणि तो एकत्र बसले आहेत. दीपिका आणि शोएब यांनी डोक्यावर टोपी घातली आहे. ज्यावर आई आणि बाबा असं लिहिलं आहे. तर हा फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘ही बातमी तुम्हा सर्वांसोबत आनंदाने, कृतज्ञतेने, उत्साहाने आणि थोड्या नर्वसनेससोबत शेअर करत आहे. हा आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा आहे… होय. आम्ही लवकरच आमच्या पहिल्या मुलाचे पालक होणार आहोत. लवकरच आम्ही आई-बाबा होणार. आमच्या लहान बाळासाठी तुमचे खूप प्रेम आणि प्रार्थना आवश्यक आहेत.’
Actress Pregnancy ; Deepika च्या घरी हलणार पाळणा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -