Sunday, February 22, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; पाऊले चालती पंढरीचा वाट; ४ वारकऱ्यांपासून सुरू झाली दिंडी, आता...

कोल्हापूर ; पाऊले चालती पंढरीचा वाट; ४ वारकऱ्यांपासून सुरू झाली दिंडी, आता १५० सहभागी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर – मनामध्ये सावळ्या विठ्ठलाची आस, मुखामधे हारिनामाचा गजर, सोबतीला टाळमृदंगाचा गजर व खांद्यावर भगवी पताका डोईवर घेऊन ग्याण्बा तुकारामचा जयघोष
करत भक्तीमय वातावरणात आज चांदे (ता. राधानगरी) येथील दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या दिंडीत जवळपासच्या चाळीस वाडया वस्त्यातील १५० वारकरी सहभागी झाले आहेत.

चांदे येथील या दिंडीला जवळपास २०० वर्षाची परंपरा आहे. प्रत्येक वर्षी अखंडीतपणे माघवारीसाठी येथून दिंडीचे प्रस्थान होते. महिणाभराच्या पायी प्रवासानंतर ही दिंडी पंढरपूरमध्ये पोहचते. तत्पुर्वी चांदे येथील मुकूंद महाराजांच्या समाधिला आभिषेक करून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते. या दिंडीचे मालक माऊली महाराज चांदेकर यांच्या व्यवस्थापणाखाली या दिंडीची परंपरा सद्या अखंडीतपणे सुरू आहे. पायी दिंडीची इतक्या वर्षाची परंपरा असणारी ही जिल्हयातील एकमेव दिंडी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -