Monday, April 22, 2024
Homenewsटायर फुटून भरधाव कारने घेतल्या तीन पलट्या; एक ठार, एक जखमी

टायर फुटून भरधाव कारने घेतल्या तीन पलट्या; एक ठार, एक जखमी

औरंगाबाद भरधाव कारचे टायर फुटल्याने ती दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात कारमधील तरुणाचा मृत्यू झाला आणि एक तरुण जखमी झाला असून एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास जळगाव रोडवरील वोक्हार्ट कंपनी समोर घडली. सय्यद जावेद सय्यद अहमद (वय -32, ह. मु. नारेगाव रा. गल्ली क्र. 6, रहेमानिया कॉलनी)
चिस्तिया चौकाकडून दोघे मित्र आणि एजाज हे दोघे मंगळवारी रात्री कारने (एमएच 02 – सीआर 4290) जात होते.

त्यांची कार जळगाव रोडला लागल्यानंतर भरधाव वेगाने निघाली.वोक्हार्ट चौकाजवळ अचानक कारचे टायर फुटले आणि कारणे तीन पलट्या घेतल्या ही कार थेट बाजूच्या झाडाला धडकून थांबली. अपघात इतका मोठा होता की, वेगातील कारने एका दुचाकीला ही उडवले. परंतु दुचाकीचालक सुदैवाने बचावला.

परंतु अपघातात कारचा अक्षरशचुराडा झाला असून आवेश आणि हे दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना संदीप कुलकर्णी यांच्या हेल्थ रायडर्स ग्रुपच्या शुभम गुप्ता व भीमा धर्म यांनी तात्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार(constable) एकनाथ चव्हाण करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -