Sunday, December 22, 2024
Homenewsजीवनावश्यक वस्तूं मधील किमती 20 ते 25 टक्के वाढण्याची शक्यता

जीवनावश्यक वस्तूं मधील किमती 20 ते 25 टक्के वाढण्याची शक्यता

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापरातील गॅसच्या किमतीत भडका झालेला असतानाच आता दैनंदिन वापरातील वस्तूही महागणार आहेत. फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स अर्थात एफएमसीजी(F.M.C.G) म्हणून ओळखल्या जाणार्या या जीवनावश्यक वस्तू मधील किमतीत सप्टेंबरमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता उत्पादक कंपन्यांनीच वर्तवली आहे.

सध्या महागाईने उच्चांक गाठला
आरएसएच ग्लोबल आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांसारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. एका बिस्किट तयार करणार्या कंपनीने सांगितले की, कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. पाम तेलाच्या किंमती तर गगनाला भिडल्या आहेत. या तिमाहीत खाद्यतेलाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली. म्हणूनच कंपनीने बिस्किटांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


कंपनीकडून साबण उत्पादनात वापरल्या जाणार्या वस्तूंची किंमत गेल्या सहा महिन्यांत 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्या. एकूणच उद्योगात टिकून राहण्यासाठी दरवाढ गरजेची आहे. प्रत्येक आठवड्यात साबणासाठीच्या कच्च्या मालाच्या किंमती वाढत आहेत. म्हणूनच कंपनीने मे आणि नंतर जुलैमध्ये मिळून एकूण 8 ते 10 टक्क्यांनी किंमती वाढवल्या.


एका साबण उत्पादक कंपनीच्या मुंबईतील अधिकार्याने सांगितले की, पामतेलाच्या किंमतीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे कंपनीने गेल्या सहा महिन्यांत साबणांच्या किंमतीत दोनवेळा वाढ केली. त्यातील दुसरी दरवाढ 1 जुलैला करण्यात आली.


पामतेल व मोहरीचे तेल महागणार?
एका बड्या कंपनीच्या अधिकार्याने सांगितले की, खाद्यतेलाच्या किंमतीमधील वाढ ग्राहकांसाठी आणि कंपन्यांसाठी परवडणारी नाही. देशात सण व उत्सवास सुरुवात झाल्याने पुरवठ्यावर ताण येणार आहे. अर्धे वर्ष उलटले असून पाम तेलाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे कॅनडातून येणार्या पाम तेल आणि मोहरीच्या तेलाची भविष्यात मोठी कमतरता भासण्याची भीतीही या अधिकार्याने व्यक्त केली आहे.


पामतेलाच्या किंमती आवाक्याबाहेर!
जागतिक पातळीवर पामतेलास जास्त मागणी असून पाम तेल उत्पादक मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कच्च्या पाम तेलावरील आयात करात जून महिन्यात 35.75 टक्क्यांवरून 30.25 टक्क्यांपर्यंत कपात केली. यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. अजूनही पामतेलाचा पुरवठा प्रभावित आहे. याउलट भारतात मोठ्या प्रमाणात तेल आयात करावे लागत असल्याने किंमती नियंत्रणाबाहेर आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -