Tuesday, August 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : 10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

कोल्हापूर : 10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात/परिसरात 7 दिवस 144 कलम लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद होणार असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.

10 वी व 12 च्या परीक्षा येत्या 21 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहेत. ही परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी हा कलम लागू करण्यात आला आहे. परीक्षा कालावधीत तसेच ज्या दिवशी पेपर नसतील ते दिवस वगळून दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायं. 6 वाजेपर्यंत मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास/ वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी घातली आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती गुन्हा नोंद केला जाणार आहे. बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही, असेही कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -