Tuesday, August 5, 2025
Homeमहाराष्ट्र22 फेब्रुवारीला राज्यभरात चक्कजाम आंदोलन; राजू शेट्टींचा इशारा

22 फेब्रुवारीला राज्यभरात चक्कजाम आंदोलन; राजू शेट्टींचा इशारा

मुकादमकडून ऊस मजुरांची फसवणूक सुरु आहे.वाहतूक दारांना देखील मुकदमांचा त्रास सुरु आहे.वसुलीसाठी गेल्यास त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात.कारखाना आणि वाहतूक दरामध्ये करार केला जातो. त्यावरच बँका वाहतूकदारांना कर्ज देतात. त्याशिवाय आर्थिक खर्चासाठी स्वतःचे सोने गहाण ठेवतात. मात्र या दोन वर्षात 246 कोटी वाहतूक दारांचे थकवले आहेत. मुकादम ही पद्धत संपुष्टात यावी,कारखानदारांनी वाहतूकदार पुरवावे. ऊस तोडणी कल्याण मंडळामार्फत नोंदणी करून ऊस तोडणी मजूर पुरवावेत अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली. त्याचबरोबर स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटना स्थापन करत असल्याची घोषणा ही राजू शेट्टी यांनी केली. आज ते कोल्हापुरात बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, शेतकरी आंदोलन असल्यावर पोलीस जनरल डायरच्या भूमिकेत असतात. तुम्ही अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ.आमच्याकडे एक तणनाशक आहे, त्यापुढे कमळ देखील फुलणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. हातकणंगले मतदार संघावरून पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली.

प्रमुख मागण्या

-खोटे दाखल करताना पोलिसांनी सखोल चौकशी करावी.

-ज्या वाहतूकदारांच्या टोळ्या पळून गेल्या आहेत, त्यांच्या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. त्यात राज्यसरकारने मध्यस्ती करावी

-कर्ज फेडण्यासाठी 5 वर्षाची मुदतवाड द्यावी

-हंगाम संपल्यानंतर ऍडव्हान्स, जमा खर्चाचा अहवाल द्यावा

-नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने 50 हजाराचे अनुदान तातडीने द्यावे

-विविध मागण्यासाठी येत्या 22 फेब्रुवारीला राज्यभरात चक्कजाम आंदोलन

-सदोष वीजबिल दुरुस्त करून द्यावीत

वीज मंडळाने 37 टक्के विजवाढ़ प्रस्ताव रद्द करावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -