केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (दि. 19) कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा पथकाकडून गुरुवारी शहा यांच्या उपस्थित होणार्या कार्यक्रमांची, ज्या ठिकाणी भेट देणार आहेत, त्या ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे.
केंद्रीय सुरक्षा पथकाचे अधिकारी आज हैदराबादहून कोल्हापुरात आले.शहा यांचे रविवारी दुपारी आगमन होणार असून यानंतर ते करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. याचदरम्यान ते शाहू समाधीस्थळालाही भेट देण्याची शक्यता आहे.
भाऊसिंगजी रोडवरील राजहंस प्रिंटींग प्रेससमोरील भाजपा कार्यालयातही त्यांचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान शहा यांच्या उपस्थितीत पेटाळा येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे. सर्व कार्यक्रमस्थळाची या पथकाकडून पाहणी होणार आहे. यावेळी स्थानिक पोलिस अधिकार्यांसमवेत ते बैठकही घेणार आहेत.