Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरहसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ, मुलांचा अटक पूर्व अर्ज मंजूर करू नये-...

हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ, मुलांचा अटक पूर्व अर्ज मंजूर करू नये- ईडी

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.कारण मुश्रीफ यांच्या मुलांनी अटक पूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जाला ईडीने विरोध दर्शविला आहे. सोमय्या यांच्या आरोपानंतर आयकर व ईडीने मुश्रीफ यांच्या घरावर दोन वेळा छापे टाकले होते.

हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आयकर व ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेवर ईडीने छापा टाकला.त्यानंतर मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ, साजिद मुश्रीफ आणि अबिद मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र याला ईडीने विरोध दर्शविला आहे. कारण जर अटक पूर्व जामीन मंजूर केल्यास तपासावर परिणाम होईल असं ईडीने कोर्टात म्हणणं मांडलं आहे.

नाविद मुश्रीफ यांना ईडीने दोन समन्स बजावले होते. शिवाय तपासादरम्यान नाविद यांनी सहकार्य केले नसल्याचे देखील ईडीने कोर्टात म्हटलं आहे.त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या आणि त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -