Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूरात दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुण ठार

कोल्हापूरात दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुण ठार

ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दुचाकींची समोरासमोर धडक होऊन कदमवाडी परिसरातील संतोष बाळासाहेब पाटील (वय 30, रा. कदमवाडी) व अक्षय सुरेश पाडळकर (24, भोसलेवाडी) हे दोन तरुण जागीच ठार झाले; तर टेंबलाईवाडी येथील दाम्पत्यासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी (ता. करवीर) येथे रविवारी सकाळी हा अपघात झाला. जखमीमध्ये नीलेश रवींद्र संकपाळ (34, विठ्ठल मंदिर चौक, कदमवाडी), जयदीप जनार्दन कदम (45) व सुवर्णा जयदीप कदम (40, लक्ष्मी कॉलनी, टेंबलाईवाडी) यांचा समावेश आहे. त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

तासभर वाहतूक विस्कळीत अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कदमवाडी येथील बालशिवाजी तरुण मंडळ चौक परिसरातील अक्षयसह संतोष व भोसलेवाडीतील नीलेश संकपाळ हे मित्र गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत कामाला आहेत. पन्हाळगडावर शिवभक्तांचा जल्लोष पाहण्यासाठी हे तिघेही रात्री दुचाकीवरून पन्हाळ्याला गेले. पहाटे दुचाकीवरून ते कोल्हापूरला येत होते.

टेंबलाईवाडी येथील जयदीप हे पत्नी सुवर्णासमवेत जोतिबा दर्शनासाठी दुचाकीवरून जात होते. आंबेवाडी येथील साई हॉटेलसमोर ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीची कोल्हापूरच्या दिशेने येणार्‍या दुचाकीशी समोरासमोर धडक झाली.

दाम्पत्यासह तरुणही रस्त्यावर

या धडकेने कदम दाम्पत्यासह तरुण रस्त्यावर फेकले गेले. डोके आपटल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले. पाठीमागून येणार्‍या अन्य वाहनांचाही त्यांना जबर धक्का लागला. यामध्ये अक्षय पाडळकर व संतोष पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

कदमवाडी परिसरातील दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजताच घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात कुटुंबीय, नातेवाईकांसह तरुणांची गर्दी झाली होती.

अपघातात ठार झालेल्या अक्षय पाडळकर याच्या घरची स्थिती बेताची आहे. कारखान्यात मजुरी करून बहिणींसह वृद्ध आजीचा तो सांभाळ करत होता. आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या अक्षयच्या आईचे 17 वर्षांपूर्वी, वडिलांचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले. आजीने भावंडांना लहानाचे मोठे केले. भावाच्या अपघाती मृत्यूने बहिणीचा आधार हरविला आहे. अपघातात जखमी झालेल्या नीलेश संकपाळ याची प्रकृती चिंताजनक आहे.

कदमवाडी येथील बाल शिवाजी तन्रुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये अपघातातील मृत व जखमींची जवळीक होती. संतोष व अक्षयचा मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात शोककळा पसरली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -