Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात उष्णतेची लाट येणार, वाचा हवामान विभागाचा इशारा..

राज्यात उष्णतेची लाट येणार, वाचा हवामान विभागाचा इशारा..

राज्यात दुपारी ऊन तर इतर वेळी थंड वातावरण मागील काही दिवसांपासून दिसत आहे. आता पारा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राज्यात दुपारी ऊन आणखी वाढणार असून येत्या 2 दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी उन्हाचे चटके वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत येत्या 48 तासांत उन्हाचे चटके वाढणार असल्याने सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळा, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. तर या वेळेत बाहेर पडल्यास पिण्याचे पाणी आपल्यासोबत नेहमी ठेवा, असंही हवामान विभागाचे के. एस. होसळीकर यांनी सांगितलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान 37 ते 39 ℃ च्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उचांकी तापमान 37.9 अंश नोंदवले गले आहे. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून तिथे आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत असल्याने यंदा फेब्रुवारीतच तापमानाचा पारा 40℃ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तापमानाचा पाराही 30 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे सर्वाधिक 36.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटांचा काहीसा परिणाम दिसू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -