Friday, August 1, 2025
Homeक्रीडाIPL 2023 सुरु होण्याआधी विराट कोहलीच्या RCB ला बसू शकतो आणखी एक...

IPL 2023 सुरु होण्याआधी विराट कोहलीच्या RCB ला बसू शकतो आणखी एक मोठा झटका

इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा सीजन सुरु होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलच्या दुखापतीनंतर जोश हेझलवूड अकिलिसच्या दुखापतीमधून सावरतोय. त्यामुळे हेझलवूड आयपीएलमधील काही सामन्यांना मुकू शकतो. जोश हेझलवूड भारताविरुद्ध उर्वरित दोन कसोटी सामन्यातही खेळणार नाहीय. उपचारासाठी तो मायदेशी परतला आहे. 2 एप्रिलला RCB ची मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिली मॅच होणार आहे. तो, पर्यंत हेझलवूड फिट होईल का? या बद्दल स्पष्टत नाहीय.

ऑस्ट्रेलियन टीमसाठी मोठा झटका

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात 17 मार्चपासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. हेझलवूड त्या सीरीजसाठी सुद्धा उपलब्ध नाहीय. ऑस्ट्रेलियन टीमसाठी हा सुद्धा एक मोठा झटका आहे. सुरुवातीला हेझलवूड फक्त भारताविरुद्ध एका कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची माहिती होती. हेझलवूड अकिलिसच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम मॅनेजमेंटने त्याला मायदेशी पाठवून दिलय.

आरसीबीसाठी एक चांगली बातमी आहे. मॅक्सवेलची भारताविरुद्ध वनडे सीरीजसाठी निवड झालीय. मॅक्सवेलने या तीन वनडे सामन्यात फिटनेस सिद्ध केला, तर तो आयपीएलच्या पूर्ण सीजनमध्ये खेळू शकतो.

दरम्यान, 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. एकूण 10 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या 10 संघाची विभागणी ही ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. या हंगामाती सर्व सामन्यांचं आयोजन हे देशातील एकूण 12 स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मुंबईचा या मोसमातील सलामीचा सामना हा बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 2 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -