Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरचोर समजून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

चोर समजून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

इस्पुर्ली (ता. करवीर) येथे चोरी करण्यासाठी चोर आल्याच्या संशयावरून दुकान मालकाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नानासो आनंदा चौगले (वय ४७, रा.इस्पुर्ली, ता. करवीर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील दिंगबर तुकाराम मगदूम (वय ३३ ) यांचे इस्पुर्ली येथे गारगोटी मार्गावरती फॅब्रिकेटर्सचे दुकान आहे. या दुकानाच्या आवारात उघड्यावर लोखंडी पाईप व इतर साहित्य ठेवलेले आहे. मंगळवारी (दि.२२) रात्री नऊच्या सुमारास नानासो हे दुकानाच्या आवारात गेले असता, चोरीसाठी आल्याच्या संशयावरून दिगंबर यांनी लोखंडी पाईपने मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली होती. ही घटना चौगले यांच्या नातेवाइकांना समजल्यानंतर त्यांनी नानासो यांना उपचारांसाठी सीपीआर येथे दाखल केले होते. बुधवारी (दि.२३) सकाळी त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

मृताचे नातेवाईक संदीप विलास चौगले यांनी माऊली फॅब्रिकेटर्सचे मालक दिगंबर मगदूम यांनी केलेल्या मारहाणीत नानासो यांचा मुत्यू झाल्याची फिर्याद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात दिली आहे. रात्री उशिरा दिगंबर मगदूम याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी व सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी भेट दिली. मृत नानासो चौगले हे शेती करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई्- वडील व दोन मुले असा परिवार आहे. अधिक तपास इस्पुर्लीचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -